vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृत दुर्गोत्सव 2025’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

‘अमृत दुर्गोत्सव 2025’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या उपक्रमाने ऐतिहासिक कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी अमृतच्या पुणे मुख्यालयातील समारंभात ‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम’ या श्रेणीतील विश्वविक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रतिनिधी प्रवीण पटेल यांच्या हस्ते अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि संस्कृती रक्षण या गुणांना उजाळा देत समाजमन घडविणे आणि महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणे हा होता. याअंतर्गत, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बारा दुर्गापैकी कोणत्याही एकाची प्रतिकृती अंगणात, सोसायटीत किंवा शाळेत तयार करून, त्यासोबतचा फोटो ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ च्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते

संबंधित पोस्ट

म्हाडाची 1 ऑक्टोबर रोजी सोडत

vishwatmaklokswamivarta

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत…

राज्य सरकार चा निर्णय  दुधाच्या भेसळीवर मोक्का कायदा लागू करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार…

महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास एक तृतीयांश महिला आहेत; नवीन भारत महानगरांच्या पलीकडे व्यापक सहभागाचा साक्षीदार होत आहे : डॉ जितेंद्र सिंह

vishwatmaklokswamivarta