vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार- रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार- रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार

        सांगली, प्रतिनिधी) : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.16 नोव्हेंबर 2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपरिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील असे निर्देश दिले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. पवन म्हेत्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा (उरुण- ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस) व 2 नगरपंचायत (शिराळा, आटपाडी) यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा दि. 10 नोव्हेंबर 2025 ते दि. 17 नोव्हेंबर 2025 (सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 पर्यंत) आहे. तसेच या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे.

      परंतु, आता संगणकप्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आलेले असल्याने तसेच नामनिर्देशनपत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील असे निर्देश दिले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र MSME परिषद २०२६’२,५०० हून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत दिग्गजांचे होणार मंथन

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते साई राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीओइ) गांधीनगर येथे एकात्मिक क्रीडा पायाभूत सुविधांचे उद्घाटन

ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम

अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायन-पनवेल महामार्गावरीलठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न..