vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

१ डिसेंबर : ३७ वा जागतिक एड्स दिन — अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

१ डिसेंबर : ३७ वा जागतिक एड्स दिन — अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

आरोग्य प्रतिनिधी-एड्स या आजाराने सुरुवातीच्या काळात संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. मात्र विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रभावी आरोग्य उपक्रमांच्या माध्यमातून आज या आजारावर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. एचआयव्ही/एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी, संक्रमित व्यक्तींना आधार देण्यासाठी आणि एड्समुळे प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.

🔹 यंदाचा जागतिक एड्स दिनाचा २०२५ चा विषय“व्यत्ययांवर मात करणे, एड्स प्रतिसादात परिवर्तन”२०३० पर्यंत एड्स संपवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा संदेश देण्यात आला आहे.🔹 अकोला जिल्ह्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजनजिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपसंचालक डॉ. सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्यातर्फे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था आणि गावपातळीवर विविध जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

🔹 एचआयव्ही म्हणजे काय?एचआयव्ही (मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू आहे. उपचार न केल्यास तो एड्समध्ये बदलतो. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यानंतर शरीर इतर संसर्गांना अधिक बळी पडते.🔹 एचआयव्हीची लक्षणे,ताप,डोकेदुखीथकवा,भूक कमी होणे,लसिकाग्रंथी सूज,नागीण,सहा महिन्यात १० किलोपेक्षा जास्त वजन घटणेवारंवार तोंड येणे🔹 संसर्ग होण्याचे मार्ग,असुरक्षित लैंगिक संबंध,संक्रमित रक्त व रक्तघटक,सुया-सिरींज सामायिक वापर,गर्भवती मातेकडून बाळाला🔹 उपचार : एआरटी म्हणजे काय?अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) ही अशी औषधोपचार पद्धती आहे जी एचआयव्ही विषाणूची प्रतिकृती होण्याची गती कमी करते.

नियमित आणि आयुष्यभर घ्यावी लागतेरोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यासाठी मदत होतेलवकर उपचार सुरू केल्यास एड्स होण्यापासून बचावरुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात,याशिवाय एड्सग्रस्तांमध्ये वाढणाऱ्या क्षयरोग, न्यूमोनिया, कँडिडिआसिस, हर्पिससारख्या संधीसाधू संसर्गांवर वेळेत उपचार केले जातात

🔹 महाराष्ट्राची प्रगती,देशाच्या तुलनेत महाराष्ट्राने एचआयव्ही नियंत्रणात मोठे यश मिळवले आहे.सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी मोफत,आधुनिक उपचार उपलब्ध,गाव ते जिल्हा पातळीपर्यंत आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी जनजागृतीसाठी कार्यरत🔹 अकोला जिल्ह्याला एड्समुक्त करण्याचे आवाहन“लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास एचआयव्हीग्रस्त व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकतात. जागतिक एड्स दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून अकोला जिल्हा एड्समुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया,” असे आवाहन जिल्हा प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलवाल, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

एम्स नागपूर आणि बाल आयुष फाउंडेशन यांच्यात अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बीएमटी) सेवावृद्धीसाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन, जिल्हा क्षयरोग मुक्तीसाठी सर्वांनी मिळून काम करावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध अभियान 2025

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा- मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जपले जातेय घरेलू कामगार महिलांचे आरोग्यलाभार्थींनी मानले राज्य शासन, आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे आभार…