vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील फळबागांना भेट

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील फळबागांना भेट

नागपूर, प्रतिनिधी: रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील विविध प्रगतीशील शेतकऱ्यांच्या फळबाग व नर्सरींना भेट देऊन पाहणी केली. कळमेश्वर तालुक्यातील कोहळी, काटोल तालुक्यातील हातला येथील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या फळबागांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, फलोत्पादन विभागाचे संचालक अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.देवानंद पंचभाई, वंडली येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ.मेघा डहाळे, कृषी महाविद्यालयाचे विभागीय प्रमुख डॉ. विनोद राऊत तसेच मनोज जवंजाळ यांच्यासह फलोत्पादन व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सर्वप्रथम त्यांनी कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतलेल्या कोहळी येथील सुषमा सुभाषराव वानखडे यांच्या फळबागेला भेट दिली. यात त्यांनी इंडो इस्राइल पद्धतीने संत्रा फळ पिकाची लागवड, बेन्डिंग पद्धती, रोटावेटर व तन नाशकाचा कमीत कमी वापर, जैविक खताचा वापर आदी विषयांची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर त्यांनी काटोल तालुक्यातील हातला येथील प्रगतीशील शेतकरी धीरज जुनघरे यांच्या शेतीला भेट दिली. एकूण 45 हेक्टर मध्ये संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. यासाठी इंडो इस्राइल पद्धतीने आधुनिक लागवड करण्यात आली आहे. यासाठी आधुनिक सिंचन प्रणाली व पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून उच्च उत्पादकता मिळविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या सर्वांची माहिती फलोत्पादन मंत्री गोगावले यांनी यावेळी घेतली. काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रालाही त्यांनी भेट दिली.

काटोल येथे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रास भेट देऊन तेथील संशोधन कार्याची पाहणी केली. विद्यापीठाने इंडो इस्राइल पद्धतीने लागवड केलेल्या मातवृक्ष बागांची, शेड नेट मध्ये उत्पादीत संत्रा मोसंबी कलमांची तसेच संग्रहित केलेल्या संत्रा, मोसंबीच्या विविध वानांच्या फळाच्या प्रदर्शनीची पाहणी केली.

०००

संबंधित पोस्ट

जव्हार अर्बन बँकेच्या नोकर भरतीसाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेवर कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सजग राहण्याचे आव्हान-कौतिकराव ठाले पाटील

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढइयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

समुद्र से समृद्धी उपक्रमांतर्गत सागरी व ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना…