vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार — काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार — काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा.

 

राज्य प्रतिनिधी-मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार — काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 2025) काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी आजच्या मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात घोषणा केली आहे. स्वतंत्र पालिका निवडणूक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले.

मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथाला यांनी ही घोषणा केली.

मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, हे आम्ही मांडलं.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्यासोबत आम्ही युती कायम राहिली आहे, त्यांच्याशीही आम्ही बोलणार आहोत, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला बिहारच्या निवडणुकीवर भाष्य करतांना म्हणाले की, “हा निवडणूक आयोगाचा विजय असून, भाजपचा नाही. काँग्रेसमध्ये प्रत्येक जातीचे लोक आहेत. त्यांच्या पक्षात फक्त एका जातीचे लोक आहेत, ही आमची परंपरा आहे. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला असून, याबाबत लोकांमध्ये जाऊन जागृती करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत असतात, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास होता विरोध गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात आठ ते नऊ वेळा भेट झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही बंधू आगामी निवडणुका एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंचा पक्ष महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्याने त्यांचा मनसेला मविआत घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र काँग्रेसने  त्याला विरोध दर्शविला. पंरतु, आता काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

संबंधित पोस्ट

दिवाळीपूर्वी वेतन अदा करा : आमदार सुधाकर अडबाले मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच प्रधान सचिवांकडे मागणी…

कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर-पालकमंत्री*अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन वाहने दाखल;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण..

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित, पंतप्रधानांनी हा पुरस्कार केला देशवासियांना समर्पित.

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील