vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता- विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता- विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश

सांगली, प्रतिनिधी: ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत: खालचा जबडा अडकलेला असल्याने बोलता व खाता येत नव्हते. तिची खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरेलु कामगार आरोग्य तपासणी शिबीरांतर्गत पार पडले. यामुळे त्या मुलीला अन्नग्रहण करता येऊ लागले आहे. तसेच बोलण्याच्या क्रियेची सुरवात होऊ लागली आहे. सदर मुलीने तिच्या वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेवून आपल्यावर झालेल्या खर्चिक उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यानींही सदर मुलीची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदि उपस्थित होते.

यावेळी शस्त्रक्रिया पार पडलेल्या वसंतदादा पाटील दंत रुग्णालय, कवलापूर येथील डॉ. श्रीनिवास अष्टेकर, डॉ. सचिन मजती, डॉ. सुरेखा बेडसगावकर व डॉ. अनिरुध्द पाटील या टीमने पार पाडली. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांचे कौतुक केले.

00000

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर 

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24×7 तास कार्यान्वित ठेवा

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न* *ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

सांगली आंबा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद,३३.६० लाखाची उलाढाल..

गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ४० हजार बंगाली नागरिकांना मोठा दिलासा