vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई, प्रतिनिधी : खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी करिता ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.

शेतकरी नोंदणीस देण्यात आलेल्या मुदतवाढ कालावधीत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन शेतकऱ्यांच्या नोंदणीची कार्यवाही करण्याबाबत विभागाने संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे. शेतकरी नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत होती, तिला वाढ देण्याबाबत लोकप्रतिनिधीनकडून तसेच विविध स्तरावरुन मागणी होती. त्याअनुषंगाने खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्र 2047 – व्हिजन डॉक्युमेंट सर्वेक्षणात सहभागासाठी उरले फक्त सहा दिवस..

दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकरात लवकर सुरू करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ, पुढचे १५ महिने राहणार देशाच्या सरन्यायाधीशपदी.

vishwatmaklokswamivarta

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

vishwatmaklokswamivarta