vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

‘सिकलसेल मुक्त’साठी ‘अरुणोदय’ मोहिम*आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

‘सिकलसेल मुक्त’साठी ‘अरुणोदय’ मोहिम*आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

 

     अमरावती, प्रतिनिधी) : सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘अरुणोदय’ ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आज येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर पार पडले.

   ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला श्रीमती डॉ. पोटपिटे, डॉ. शिरसाठ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी वनिता शिंदे, जिल्हा सिकलसेल समन्वयक गोकुळ ठाकूर उपस्थित होते. उपस्थितांनी मोहिमेचे नियोजन, सिकलसेलचे लवकर निदान, उपचार आणि जनजागृती या विषयावर मार्गदर्शन केले

       ही मोहीम राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. सिकलसेल हा अनुवांशिक आजार असून लाल पेशी विळ्याच्या आकाराच्या झाल्यामुळे रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा येतो, त्यामुळे विवाहापूर्वी ‘सोल्युबिलिटी टेस्ट’ करणे आवश्यक आहे. लाल आणि पिवळे कार्ड असलेल्या व्यक्तींनी आपापसात विवाह टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे     सिकलसेलग्रस्त रुग्णांना शासनामार्फत विविध सवलती दिल्या जातात. यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत जादा वेळ, एसटी बस प्रवासात सवलत दिली जाते.

     जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन सिकलसेलची मोफत तपासणी करून या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

श्री गणेशा आरोग्याचा; उपक्रमात २० हजार जणांची आरोग्य तपासणी..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय नमुना पाहणीः कुटुंबांचे आरोग्य सर्व्हेक्षण

vishwatmaklokswamivarta

आरोग्य विभागातील ७ आरोग्य सहाय्यक यांना आरोग्य सेवक या पदोन्नतीचा लाभ

59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

रूग्णालयातील रांगांपासून ‘आभा’ ॲपमुळे सुटका –सर्वाधिक ऑनलाईन नोंदणी करणारे वाशी रूग्णालय ‘टॉप थ्री’ मध्ये*