ICANN85 ने मुंबईत सुरक्षित आणि लवचिक इंटरनेटच्या बळकटीकरणासाठी सहकार्याची केली पुष्टी
माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी –
सर्व क्षेत्रांमधून नवोन्मेष, सहकार्य आणि अर्थपूर्ण सहभागाला समर्थन देणाऱ्या विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे: सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्स (ICANN) द्वारे आयोजित आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI) च्या सहकार्याने आयोजित ICANN85 कम्युनिटी फोरमने जागतिक इंटरनेट परिसंस्थेत खुले, सुरक्षित, समावेशक आणि लवचिक इंटरनेटसाठी कसे सहाय्य करावे, यावर चर्चा करण्यासाठी जागतिक इंटरनेट भागधारकांना मुंबईत एकत्र आणले.ICANN85 कम्युनिटी फोरम सध्या मुंबईत सुरू आहे. तो 7 मार्च 2026 रोजी सुरू झाला असून 12 मार्च 2026 पर्यंत सुरू राहील.
आज झालेल्या उच्चस्तरीय सरकार आणि उद्योग सत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन; महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि आयसीएएनएन बोर्डाच्या अध्यक्षा तृप्ती सिन्हा यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इंटरनेट क्षेत्रातील नेते एकत्र आले.
इंटरनेट आज जगभरातील अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवा, नवोन्मेष आणि दैनंदिन जीवनाला आधार देणारी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा बनली आहे. डिजिटल स्वीकार वाढत असताना इंटरनेट खुले, सुरक्षित, लवचिक आणि समावेशक राहावे यासाठी आपण एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे. ICANN सारखे मंच सरकारे, खाजगी क्षेत्र, तांत्रिक समुदाय आणि नागरी समाज यांना एकत्र आणून इंटरनेट प्रशासनासाठी बहु-भागधारक दृष्टिकोन मजबूत करतात. भारत या जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमधून नवोन्मेष, सहकार्य आणि अर्थपूर्ण सहभागाला समर्थन देणारी विश्वसनीय डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन म्हणाले.आज इंटरनेट हा आर्थिक विकास, प्रशासन आणि दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा चर्चा सहकार्य मजबूत करण्यास मदत करतात आणि इंटरनेट सर्व प्रदेशांमध्ये नवोपक्रम आणि विकासाला पाठिंबा देत राहील याची खात्री करतात,” असे महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले
“जग अधिक गुंतागुंतीचे आणि कधीकधी अधिक विभाजित होत आहे – म्हणूनच इंटरनेटची स्थिरता आणि अखंडता आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे,” असे आयसीएएनएन बोर्डाच्या अध्यक्षा तृप्ती सिन्हा म्हणाल्या
ICANN85 कम्युनिटी फोरममध्ये जगभरातील सरकारे, उद्योग नेते, तांत्रिक तज्ञ आणि नागरी समाज सहभागी असलेल्या 200 हून अधिक सत्रांचा समावेश आहे. ही सत्रे इंटरनेटच्या सुरक्षित आणि स्थिर परिचालनाशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतात,
ICANN विषयी अधिक माहिती
CANN चे ध्येय स्थिर, सुरक्षित आणि एकात्म जागतिक इंटरनेट सुनिश्चित करण्यात मदत करणे हे आहे. ICANN ची स्थापना 1998 मध्ये जगभरातील सहभागींच्या समुदायासह एक ना-नफा सार्वजनिक लाभ निगम म्हणून झाली.