vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान

19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा महासभेत सन्मान

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- फेब्रुवारी 2026 मध्ये झिम्बावे आणि नामिबिया येथे झालेल्या आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे उपकर्णधारपद भूषविणारे भारतीय संघातील यष्टिरक्षक – फलंदाज श्री. अभिज्ञान अभिषेक कुंडू यांचा नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेत महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते सभागृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती श्री. अशोक पाटील, सभागृह नेते श्री. सागर नाईक, विरोधी पक्षनेते श्री.विजय चौगुले, क्रीडा समिती सभापती श्री. गिरीश म्हात्रे व उपसभापती श्री. राजू मढवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांचे प्रशिक्षक श्री.चेतन जाधव यांनाही सन्मानीत करण्यात आले.

सभागृह नेते श्री. सागर नाईक यांनी मांडलेल्या अभिनंदनपर प्रस्तावास विरोधी पक्षनेते श्री.विजय चौगुले यांनी अनुमोदन दिले. आयुक्त, उपमहापौर व महापौरांनीही यावेळी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली. कोपरखैरणे येथे वास्तव्यास असलेला अभिज्ञान अभिषेक कुंडू यांनी 19 वर्षाखालील भारतीय संघाचा उपकर्णधार तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक, फलंदाज म्हणून भारतीय संघासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळताना एकूण 4 अर्धशतके करुन मोलाचे योगदान दिले. अंतिम सामन्यात इंग्लड विरूध्द विजयश्री मिळवून अंडर 19 विश्वचषक जिंकणा-या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत अभिज्ञान यांनी संपूर्ण विश्वचषक मालिकेत 239 धावा केल्या असून संघातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली आहे.

     यापूर्वी सन 2025 मध्ये पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेतही त्यांनी जलद द्विशतकाचा विश्वविक्रम प्रस्थापित करीत नाबाद 209 धावा आपल्या नावावर नोंदवल्या असून भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे

       भारतीय संघामध्ये उपकर्णधार म्हणून आपले स्थान भक्कम करणारा आणि नवी मुंबई शहराचे नाव देशात व जगात उज्ज्वल करणारा हा उदयोन्मुख खेळाडूस नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महासभेत सन्मानीत करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

टेबल टेनिसच्या मैदानात जिल्हाधिकाऱ्यांची फटकेबाजी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन

भारताने प्रथमच पटकावला स्क्वॉश विश्वचषक, चेन्नई इथल्या अंतिम सामन्यात हाँगकाँगला नमवत केली सर्वोच्च कामगिरी..

vishwatmaklokswamivarta