vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मिशन लक्षवेध’ अंतर्गत कुस्ती खेळाडूंची फेर निवड चाचणी; 6 मे रोजी आयोजन*इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिलपर्यंत सादर करावेत

‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत कुस्ती खेळाडूंची फेर निवड चाचणी; 6 मे रोजी आयोजन*इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिलपर्यंत सादर करावेत

अमरावती, प्रतिनिधी ऑलिम्पिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘मिशन लक्षवेध’ ही महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अमरावती जिल्हा स्तरावर ‘क्रीडा प्रतिभा विकास केंद्र’ स्थापन करण्यात आले असून, कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यासाठी येत्या 6 मे 2026 रोजी फेर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या चाचणीत जिल्ह्यातील पात्र खेळाडूंना सुवर्णसंधी मिळणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

ही निवड चाचणी 6 मे रोजी सकाळी 8 वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे पार पडणार आहे. या खेळाचे आयोजक राहुल निवडंगे ( 7774001579) आहेत. यापूर्वी 9 एप्रिल रोजी चाचणी घेण्यात आली होती, मात्र आता पात्र खेळाडूंसाठी पुन्हा एकदा फेर चाचणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी 21 वर्षांखालील (31 डिसेंबर 2026 रोजी वय ग्राह्य) मुले व मुली पात्र असून, खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसेच, संबंधित खेळाडूने गेल्या दोन वर्षांत राज्यस्तरावरील शालेय किंवा अधिकृत क्रीडा संघटनेच्या स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा पदक प्राप्त केलेले असावे. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आपला जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिकृत डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र, आधारकार्ड, क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, पालकांचे संमतीपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या 20 खेळाडूंना शासनाच्या वतीने प्रगत प्रशिक्षण दिले जाईल. ही प्रक्रिया अनिवासी स्वरूपाची असली तरी खेळाडूंचा पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास खर्च, वैद्यकीय उपचार आणि विम्याचा संपूर्ण खर्च मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत केला जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या निवड चाचणीचे आयोजन क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती ममता कोळमकर ( 9823704347) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, जिल्ह्यातील जास्तीत -जास्त कुस्तीगीरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ

शाळा वाचविण्यासाठी हुतात्मा चौक ते महापालिका कार्यालय पर्यंतचा सामाजिक कार्यकर्ते पालकांचा महामोर्चा 

vishwatmaklokswamivarta

11 मार्च रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत..

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगाम २०२५ पीकस्पर्धा स्पर्धेत पाच पिकांचा समावेश, जिल्ह्यातील शेतक-यांना सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता-महाराष्ट्र दिनी सीईआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेस आयकियामार्फत 2 सक्शन वाहने प्रदान,केंद्र सरकारच्या नमस्ते योजने अंतर्गत 230 सफाई मित्रांना पीपीई किटचे वाटप व प्रशस्तीपत्रे वितरण

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन