vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

मुंबई, प्रतिनिधी : इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल. मंत्री-अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा. मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा. अधिकाऱ्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात. शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.

     ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले आहेत

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती मुरबाड येथे बैठक…

महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रोबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… वाट पाहतंय आपली … भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद निवडणुकीमुळे शेगाव येथील मंगळवारचा आठवडी बाजार रद्द…

vishwatmaklokswamivarta

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर – दिवाळीत म्हाडाच्या घरांची विक्री – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज सुरू

vishwatmaklokswamivarta

वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या देशभरातील अनेक टोळ्या डीआरआयने आणल्या उघडकीस देशभरात संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 440 हून अधिक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले किंवा संरक्षित वन्यजीव तसेच सुमारे 15 किलो हस्तिदंती वस्तू आणि हस्तिदंत जप्त; 33 जणांना अटक

vishwatmaklokswamivarta