vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरीकांच्‍या मदतीसाठी हेल्‍पलाईन

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरीकांच्‍या मदतीसाठी हेल्‍पलाईन

 

नांदेड प्रतिनिधी:- कुणबी नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्र मिळविणे तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी याबाबत नागरीकांना सहाय्य करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात हेल्‍पलाईन क्रमांक सुरु करण्‍यात आला आहे. सदर विषय हाताळण्‍यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली आहे. तरी नांदेड जिल्‍हयातील नागरीकांनी कुणबी जात प्रमाणपत्र अथवा जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवताना काही अडचण, समस्‍या आल्‍यास ०२४६२-२९५३३० या हेल्‍पलाईन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे

मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्‍यात आली आहे. तसेच सामाजिक न्‍याय व विशेष सहाय विभाग, शासन निर्णय ०२ सप्टेंबर २०२५ अन्‍वये मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, याकरिता हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करुन सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

तसेच मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करतील. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील / कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील/कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी केली जाते. या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतात.

0000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन • फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान • प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्वावर निवड

पैठणला १००, पाचोडला ५० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला नवी बळकटी

vishwatmaklokswamivarta

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी. डी. एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक

स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन व्यक्तिमत्व घडविण्याचे प्रा.प्रवीण दवणे यांचे युवा पिढीला आवाहन..

vishwatmaklokswamivarta

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धएकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार..

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन