vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सार्वजनिक गणेशोत्सव व दुर्गा उत्सव मंडळांनी कायमस्वरूपी नोंदणी करावी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सव व दुर्गा उत्सव मंडळांनी कायमस्वरूपी नोंदणी करावी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : धर्मादाय सह आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांनी आपल्या मंडळाची कायमस्वरूपी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव व दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करण्याची परवानगी मिळावी यासाठी दरवर्षी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ४१ (क) अंतर्गत मोठ्या संख्येने अर्ज सादर केले जातात. मात्र, ज्या मंडळांनी संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत कायमस्वरूपी नोंदणी करून घेतलेली असेल, त्या मंडळांना दरवर्षी कलम ४१ (क) अंतर्गत स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता राहत नाही

कायमस्वरूपी नोंदणी झालेल्या मंडळांना उत्सवादरम्यान प्राप्त होणाऱ्या देणग्या, विविध वस्तू तसेच सोने, चांदी आदी मौल्यवान मालमत्तेचे नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने व्यवस्थापन करणेही अधिक सुलभ होते. त्यामुळे मंडळाच्या प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होते.

त्यामुळे धर्मादाय सह आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव व श्री दुर्गादेवी उत्सव मंडळांनी आपापल्या मंडळाची कायमस्वरूपी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन …   

संभाजी नगर प्रभाग क्रं.1 मधील रोडचे काम न करता कॉन्ट्रक्टरने उचले बिल-जिल्हाधिकारीकडे चौकशीची मागणी – डॉ.रामकृष्ण भोडोंने

पॉश” ची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा

हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात -आमदार बाबुसिंगजी महाराज

हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा*