vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल..

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल..

राज्य प्रतिनिधी-मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने सरकारने एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी इतकी मदत निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. मात्र, या निधीतून आतापर्यंत खात्यावर जमा झालेली रक्कम खूप कमी आहे. सध्या फक्त नऊशे कोटी इतकीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. जमा झालेला निधी अपेक्षित निधीच्या तुलनेत अत्यल्प आहे आणि या विलंबामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत.

निधी विलंबात ई-केवायसी प्रक्रिया मुख्य अडथळा ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे खात्यावर अनुदान जमा होण्यात अडथळा येतो आहे. शेतकऱ्यांकडे शेती फार्मर आयडी असूनही ई-केवायसी जलद झाली नाही. याशिवाय नुकसानमापन, निर्धारित निकष, आणि निधी हस्तांतरण यांच्यामध्ये वेळ लागत असल्याचा दिसतो आहे.

शेतकरी समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

संबंधित पोस्ट

नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन

चांदूर रेल्वे उपविभागात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची मोहीम सुरू; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी

प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे; विवरणपत्र दाखल न केल्यास दहा हजारांचा दंड