vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर

जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर

राज्य प्रतिनिधी-

भाजपा 4, काँगेस 3, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस 1, शिवसेना (उबाठा) आणि रा.काँगेसचा 1 अध्यक्षØ भाजपा 89, काँग्रेस 60, शिवसेना 46 राष्ट्रवादी काँग्रेस 26, शिवसेना (उबाठा) 10, रा. काँग्रेस (श प) 13 सदस्य विजयी

बुलढाणा  : जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या अध्यक्षपद व सदस्यपद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यश मिळवले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे.

बुलढाणा नगरपरिषदेत शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांनी अध्यक्षपद पटकावले आहे. चिखली नगरपरिषदेत भाजपचे पंडितराव रामराव देशमुख, देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी तुषार शिपणे, जळगाव जामोद नगरपरिषदेत भाजपचे गणेश रामेश्वर दांडगे तसेच खामगाव नगरपरिषदेत भाजपच्या अपर्णा फुंडकर यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला आहे.

लोणार नगरपरिषदेत काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी, मलकापूर येथे काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान तर मेहकर नगरपरिषदेत शिवसेना (उबाठा) गटाचे किशोर भास्कर गरोळे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. नांदुरा नगरपरिषदेत भाजपच्या मंगला सुधीर मुऱ्हेकर, शेगाव येथे काँग्रेसचे प्रकाश एकनाथ शेगोकार तर सिंदखेड राजा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे सौरभ विजय तायडे यांनी विजय संपादन केला आहे.

जिल्ह्यातील एकूण 286 सदस्यपदांपैकी भारतीय जनता पार्टीने 89 जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ मिळवले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 60, शिवसेनेचे 46 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 26 सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना (उबाठा) गटाचे 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे 13 सदस्य विजयी झाले आहेत. याशिवाय आघाडीचे 17, अपक्षांचे 12, एमआयएमचे 10, समाजवादी पक्षाचा एक तर वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी,परिवर्तन सेनेच्या वतीने अध्यक्ष धनराज थोरात यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात..

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत जिल्हास्तरीय शालेय “बॅडमिंटन” स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta