vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात

बुलढाणा, प्रतिनिधी : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त संभाजीनगर, बुलढाणा येथील अंगणवाडी केंद्रात शहरी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र (UPHC) कारंजा चौक बुलढाणा यांच्या वतीने माता व बाल आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला

यावेळी उपस्थित गर्भवती महिला, स्तनदा माता व कुटुंबीयांना स्तनपानाचे महत्त्व, योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे तसेच नवजात बालकाच्या सर्वांगीण शारीरिक व मानसिक विकासासाठी आईच्या दुधाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. सुनीता बडगे यांनी स्तनपानासंदर्भातील विविध गैरसमज दूर करत जनजागृती केली. जन्मानंतर पहिल्या तासात नवजात बालकाला स्तनपान सुरू करणे, जन्मानंतर पहिले सहा महिने केवळ आईचे दूध देणे तसेच सहा महिन्यांनंतर पूरक आहारासह दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ स्तनपान सुरू ठेवण्याचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक आहाराची पाहणी करून त्याच्या गुणवत्तेबाबत माहिती घेण्यात आली. तसेच माता व बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली

0000

संबंधित पोस्ट

जागतिक हिवताप दिनानिमित्त25 एप्रिल रोजी मोहिमेचे आयोजन

आरोग्य विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघ ठरला अजिंक्य

हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान कालावधीत प्रभावी आयोजन

जिल्हा रुग्णालयात सोमवारी कान, नाक व घसा तज्ज्ञाव्दारे तपासणी; 18 वर्षाखालील बालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  

सिकलसेल मुक्तीसाठी १५ जानेवारीपासून विशेष अभियान*७ फेब्रुवारीपर्यंत तपासणी व जनजागृती*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम क्षयरोग रूग्णांना नि:क्षय पोषण आहार वाटप