vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिव्यांग बांधव व अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

दिव्यांग बांधव व अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

बुलढाणा/शेगांव,द प्रतिनिधी राज्याचे गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर हे आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दिव्यांग बांधव तसेच अनाथ बालकांसह शेगांव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

राज्यमंत्री डॅा.भोयर यांनी श्री गजानन महाराज संस्थानचा आढावा यावेळी घेतला. तसेच वर्धा जिल्ह्यातून आलेल्या दीडशे दिव्यांग बांधव तसेच अनाथ बालकांना दर्शन घडवून दिले. तसेच त्यांच्यासोबत महाप्रसादाचा लाभही त्यांनी घेतला. संस्थानच्या वतीने त्यांचे सपत्नीक यथोचित स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा निबंधक नानासाहेब, उपशिक्षणाधिकारी(मा) आशिष वाघ, उपशिक्षणाधिकारी(प्रा) अनिल देवकर, सहायक कार्यक्रम अधिकारी मंगेश भोरसे, गटशिक्षणाधिकारी श्रद्धा वायदंडे आदी उपस्थित होते.000000

 

वृत्त क्रमांक : 162

संबंधित पोस्ट

प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेमध्ये ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी*

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने   

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

राजकीय पक्षांनी यादीभाग निहाय बीएलए यांची नेमणूक करावी — जिल्हाधिकारी किशन जावळे

संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू; सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने यांचा इशारा