vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाबळेश्वर तहसील कार्यालयात महिला दिनानिमित्त शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात* 

*महाबळेश्वर तहसील कार्यालयात महिला दिनानिमित्त शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात*

 

सातारा प्रतिनिधी. महाबळेश्वर तालुक्यामध्ये  तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत जागतीक महिला दिन तहसिल कार्यालय महाबळेश्वर येथे साजरा करणेत आला.

यावेळी कार्यक्रमासाठी शेतकरी महिला व स्थानिक निवासी महिला यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यामध्ये उपस्थित महिलांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करणेत आला.

महिला दिनाचे औचित्य साधून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करून महाबळेश्वर तालुक्यातील काही नागरीक / शेतकरी हे मुंबई व परगावी कामानिमित्त रहात असलेल्या तसेच स्थानिक निवासी शेतकरी व नागरिक यांना महसूल खात्याअंतर्गत सुविधा देण्यात आल्या. तसेच याबाबत कार्यालयीन महसूली कामकाज दिवसभर चालू ठेवण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये रहिवाशी दाखले, जातीचे दाखले इत्यादी ३१ दाखले वाटप करणेत आले. उपस्थित सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचेकडून ८अ, ७/१२ व फेरफार नक्कल एकूण २९१ वाटप करणेत आले, रेशनकार्ड-१११ वाटप करणेत आल्या, लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत एकूण २६ अर्ज मालकी हक्काची नोंद सहहिस्सेदार म्हणून घेणेकामी पती व पत्नी अर्जदार यांचेकडून प्राप्त झाले. सदर कार्यक्रमामध्ये तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी लक्ष्मी मुक्ती योजने बाबत मार्गदर्शन केले. तसेच अॅग्री स्टॅक बाबत ७/१२ सदरी महिलांची नोंद झाल्यानंतर तात्काळ शेतकरी नोंदणी करण्याबाबत आवाहन केले.

सदर कार्यक्रमासाठी नायब तहसिलदार, सहायक महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक, पोलिस पाटील व नागरीक / शेतकरी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विकसित कृषी संकल्प यात्रा’शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करणार

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट ,पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, हवामान खात्या चा अंदाज..

इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; रेडक्रॉस सोसायटी होणार सामाजिक सेवेचा वटवृक्ष – डॉ. किरण पाटील 

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

विधानसभा निवेदन :महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन