vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त

राज्य प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे.

अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या.

त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

बांधकाम कामगारांना नियुक्त संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण- सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

शेतकरी हितासाठी ऊसदरासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे रविवारी वितरण,सोहळ्यास बहुसंखेने उपस्थित राहा-प्रा.शरद वंजारे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरली आहेत, राज्यातील २९९७ धरणांत एकूण ११६२.३६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला

पीकस्पर्धेत सहभाग घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन