vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक*

*केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक*

 

रायगड प्रतिनिधी- शिवपुण्यतिथीनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या.

महाड शासकीय विश्राम गृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडचे प्रभारी प्रांताधिकारी संदीपान सानप, तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, इत्यादी प्रमुख अधिकाऱ्यांसह केंद्रीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, महावितरण, पंचायत समिती, पोलीस दल, महसूल विभाग, राज्य परिवहन, पशुवैद्यकीय विभाग, आरटीओ,रायगड रोपवे प्रशासन,आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन,पाणीपुरवठा विभाग यांसह अन्य शासकीय,प्रशासकीय विभागांचे प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवर आहॆ. प्रत्येकाने आपले काम चोख बजवावे असे सांगितले.

यावेळी श्री गोगावले यांनी प्रत्येक विभागाकडून रायगडच्या पायथ्यापासून ते प्रत्यक्ष गडावर होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

यामध्ये वाहनतळ, एसटी गाड्यांचे जाण्या-येण्याचे नियोजन, प्रमुख व आवश्यक ठिकाणी वीजपुरवठा, पिण्याचे पाण्याचे नियोजन, रोपवेच्या वापराच्या वेळा, गडाचा पायथा ते गडावरील कार्यक्रमा दरम्यानची आरोग्य सुविधा, तात्पुरती होणारी हेलिपॅड निर्मिती, रस्ते व दळणवळणाचे नियोजन या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून यातील त्रुटी व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

संबंधित पोस्ट

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचीसमता पंधरवडा कालावधीत विशेष मोहीम..

झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होऊ देणार नाही- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी ..

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग    विषयावरील कार्यशाळा संपन्न