vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य-कृषी योजनांसाठी ओळख क्रमांक आवश्यक

           जालना, प्रतिनिधी- शासनाच्या कृषी विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी तात्काळ फार्मर आयडीसाठी जवळच्या ग्राम कृषी विकास समित्या तसेच सीएससी केंद्र येथे नोंदणी करुन कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 शासन निर्णयानूसार दि.15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. फार्मर आयडी अनिवार्य असल्याने सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे आणि ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करुन समन्वय साधण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांना देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. यासाठी ग्राम कृषी विकास समित्या, सीएससी केंद्रे तसेच क्षेत्रीय यंत्रणांची मदत घेण्यात यावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरातून लाखो नागरिकांना दिलासा महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची  

दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त कोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

खटाव याथील मुलींच्या शासाकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरु*