vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

सातारा प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यामध्ये एकुण 79 ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच पदाची सोडत दि. 23 एप्रिल 2025 रोजी नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सातारा अभिषेक देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये खादी ग्रामद्योग मंडळ मध संचालनालय सभागृह, महाबळेश्वर येथे पार पाडण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी खोचरे-पाटील यांनी दिली.

एकुण 79 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांची पदे अनु. जाती- एकूण 06 (3 महिला व 3 खुला) अनु. जमाती साठी एकुण 5 (3) महिला व 2 खुला), ना.मा.प्र साठी एकुण 21 (11 महिला व 10 खुला), सर्वसाधारण साठी एकुण 47 (24 महिला व 23 खुला) इतकी पदे मंजुर करण्यात आलेली आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील एकुण 79 ग्रामपंचायतीमध्ये सोडतीद्वारे अनु.जाती महिला शिदी, गुरेघर, गोडवली (एकूण-3),रेणोशी, वानवली तर्फ सोळशी, राजपुरी (एकूण-3), अनु. जमाती महिला- माचुतर, सौंदरी, उचाट (एकूण-3), अनु. जमाती- आमशी व भोसे (एकूण-2),नागरिकांचा मागास प्रवर्ग -1. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पिंपरी तर्फ तांब, मेटगुताड, अहिर, आकल्पे, मिलार, कोट्रोशी, बिरवाडी, आरय, तळदेव, पारपार, दुधगाव (एकूण-11), दांडेघर, झांजवड, येणे बु, कुमठे, कुंभरोशी, पाली तर्फ आटेगाव, कुरोशी, वेंगळे, चतुरबेट, गोगवे (एकूण 10), सर्वसाधारण -1. सर्वसाधारण महिला भेकवली, कासवंड, नार्किदा, आचली, देवसरे, शिरवली, वाळणे, कळमगाव, दाभेदाभेकर, देवळी, रुळे, वारसोळी देव, जावली, मांघर, निवळी, रामेघर, खरोशी, दाभेदाभेमोहन, खिंगर, क्षेत्र महाबळेश्वर, मोळेश्वर, घावरी, पारुट, आंब्रळ (एकूण 24), मोरणी, एरंडल, मेटतळे, हरचंदी, सोनाट, गावढोशी, अवकाळी, गोरोशी, भिमनगर, दानवली, उंबरी, तायघाट, पांगारी, वेळापुर, खांबील चोरगे, वलवण, हातलोट, सालोशी, चिखली, लाखवङ, पर्वत तर्फ वाघवळे, बिरमणी, लामज (एकूण 23) सरपंच पदे निश्चित करून जाहीर केले.

सरपंच आरक्षण सोडतीची प्रस्तावना निवासी नायब तहसिलदार दिपक सोनावले यांनी केली. सर्व सरपंच आरक्षणाचे कामकाज नायब तहसिलदार विनोद सावंत महसूल, निवडणूक नायब तहसिलदार जहिदा शेख, तसेच कार्यालयातील महसूल अधिकारी हेमंत सुळ सहा., महसूल सहाय्यक केशव नांदेडकर व इतर सर्व महसूल कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

सरपंच आरक्षण कार्यक्रमास सर्व गावांचे ग्रामस्थ, सरपंच, राजकीय पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम अधिकारी उपस्थित होते.

0 0 0 0

संबंधित पोस्ट

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा! मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत दोन ठिकाणी चरणसेवा उपक्रमांचे आयोजन

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत सुधारणा :  मदरशांना प्रस्ताव सादर करण्यासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..

डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल राज्यपालांनी व्यक्त केले दुःख

दरवर्षीप्रमाणे निलेश सांबरे यांच्याकडून ३०० मोफत बसमधून १५ हजार वारकरी भाविकांना पंढरपूर वारी…