vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

चंद्रपूर, प्रतिनिधी : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले.

नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, अजय चरडे, रविंद्र माने, तहसीलदार विजय पवार, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना, त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही वाहने चंद्रपूर, गोंडपिपरी, मुल, वरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

परळीतील महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन,लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही

भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्तेउदघाटन..भाजपा मुळे माझी महाराष्ट्राभर ओळख – भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपा जगातील नंबर वन पक्ष – रावसाहेब पाटील दानवे

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यास उग्र आंदोलन करणार – शाहूराज माने, अध्यक्ष जनसंघर्ष समिती