vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा

26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा

बुलढाणा, I प्रतिनिधी: भ्रष्टाचार निर्मूलन व प्रशासनातील पारदर्शकतेसाठी शासन परिपत्रकान्वये गठीत आणि जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा दि.26 व दि. 27 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.26 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडणार आहे. तर, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा दि. 27 जून 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता मा. अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे सभागृहात होणार आहे.

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी ज्या व्यक्तींना तक्रारी सादर करावयाच्या असतील, त्यांनी स्पष्ट शब्दांत व सबळ पुराव्यांसह प्रतिज्ञापत्रावर तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. समिती समोर उपस्थित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व पुराव्यांसह तक्रारी पूर्वतयारीनिशी सादर कराव्यात, जेणेकरून भ्रष्टाचारविरोधी लढ्यात ठोस निर्णय घेता येतील.

जिल्ह्यातील नागरिकांनी या समित्यांच्या माध्यमातून प्रशासनातील पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

श्रीसूक्त स्तोत्राचे महत्व🌹 *सुख – समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी श्रीसूक्त

vishwatmaklokswamivarta

🌹🌿🌺५ एप्रिल – संतांच्या संगतीचा परिणाम.🌺🌿🌹

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लेख ……गुरुपौर्णिमेचे महत्त्व ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात…

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण.. हा सण म्हणजे मांगल्याचा..चैतन्याचा दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त….