vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा द प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य सप्ताहानिमित्त सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 जुलै रोजी रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.

 या रोजगार मेळाव्यात कुशल/अर्धकुशल कामगार अशा सदर मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर अशा प्रकारचे एक हजार पेक्षा जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी 18 जुलै रोजी कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, मंगळवार पेठ, कराड नगरपरिषदेजवळ कराड येथे आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत  जबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी            – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष – सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा 

लातूरकरांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’

राष्ट्रीय युवा ॲथेलेटिक्स स्पर्धेत बुलढाण्याच्या नयनला रजत पदक

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी 12 ओळखपत्रांना मान्यता कोणत्याही एका वैध ओळखपत्रावर मतदान करता येणार

vishwatmaklokswamivarta

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद· सहा विभागांना याच महिन्यात भेटी विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

vishwatmaklokswamivarta