vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

(बिहारमध्ये काँग्रेस आणि आर जे डी समाजात फूट पाडत आहे* *रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित इन्साफ संमेलनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते उद्घाटन)

 

राज्य प्रतिनिधी पटना -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यांकांच्या विरोधात नाही.उलटपक्षी मोदींनी सर्व गरिबांसाठी सुरू केलेल्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ अल्पसंख्यांकांना होत आहे. जनधन योजना मुद्रा योजना आयुष्यमान योजना आदी अनेक योजनांचा देशभरात अल्पसंख्यांकांना लाभ मिळत आहे.काँग्रेस आणि राजद बिहार मध्ये धर्माच्या जातीच्या नावाने समाजात फूट पडत आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी संविधानाच्या नावाचे कव्हर असणारे पुस्तक दाखवून पवित्र संविधान ग्रंथाचा अवमान करीत आहेत.समाजात फूट पाडणारे आणि निवडणुकांवर सतत शंका घेऊन लोकशाही प्रक्रियेचा संविधानाचा अवमान राहुल गांधी करीत आहेत अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज पटना येथे केली.पटना येथे रिपब्लिकन पक्ष आणि पिछाडा मुस्लिम समाजाच्या वतीने इन्साफ संमेलन चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे आदिल असगर अडी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहार मध्ये एन डी ए ला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

00000000

संबंधित पोस्ट

पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई; अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले..

पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न**-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

सेपाक टाकरा खेळ जालना जिल्ह्याच्या गावांगावात पोहोचवीणार – मंगलाताई पाटीलजिल्हास्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धा उत्साहात संपन्न..

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया.राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा.

vishwatmaklokswamivarta

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन