vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गिरगाव चौपाटी गेट वे ऑफ इंडिया, आणि नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 गिरगाव चौपाटी गेट वे ऑफ इंडिया, आणि नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई प्रतिनिधी : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी ‘सुरक्षा दल’ हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील पर्यटनस्थळावरती सुरक्षेच्या दृष्टीने गेट वे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी, नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमण्याची कार्यवाही करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

यासंदर्भात मंत्री श्री. देसाई यांच्या निवासस्थानी मेघदूत येथे बैठक झाली. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पयटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर जयस्वाल यासह इतर अधिकारी उपस्थित होते.     मंत्री श्री. देसाई म्हणाले, सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘पर्यटन सुरक्षा दल’ हा उपक्रम सुरू आहे. टप्प्या-टप्प्याने या उपक्रमाची राज्यात व्याप्ती वाढविण्यात येत आहे. मुंबईत पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असून पर्यटकांना सुरक्षा दिल्यास सुरक्षित पर्यटन होऊन पर्यटन वाढीला चालना मिळेल.

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नरिमन पाँईट येथे ‘पर्यटक सुरक्षा दल’ नेमण्यात यावेत. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

००००००

संबंधित पोस्ट

२९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’छायाचित्रे पाठविण्यासाठी 02 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान..

vishwatmaklokswamivarta

वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, गटकर्ज व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावाया योजनांच्या लाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ‘अधिस्वीकृती पत्रिका’ मिळविण्याची संधी; जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला

vishwatmaklokswamivarta