vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता-सेवक पुरस्काराकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता-सेवक पुरस्काराकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारा’साठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना उत्कृष्ट ग्रंथालयीन सेवा मिळावी आणि वाचनसंस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.

शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट ग्रंथालयांना अनुक्रमे रु. १,००,०००/-, रु. ७५,०००/-, रु. ५०,०००/- व रु. २५,०००/- इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात येतो. त्याचबरोबर राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु. ५०,०००/- तर प्रत्येक महसुली विभागातून निवडलेल्या उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु. २५,०००/- रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट दिली जाईल.

इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत तीन प्रतींमध्ये आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपसरपंच डॉ. अनिल सरकटे आक्रमक; आरोग्य विभागाच्या पत्रात ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब!

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta

आपल्या संस्कृतीला नवकार महामंत्र निश्चितच सर्वव्यापी करतो. नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणची शक्ती असून विश्वशांतीसाठी या महामंत्राच्या जपाचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस