vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दर कपात आणि सुधारणांच्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जीएसटी परिषदेची केली प्रशंसा, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना याचा लाभ होईल

केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दर कपात आणि सुधारणांच्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जीएसटी परिषदेची केली प्रशंसा, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना याचा लाभ होईल

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याचा लाभ सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना होईल. “व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः छोटे व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय सुलभता सुनिश्चित होईल”, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात, मी जीएसटीमध्ये नवीन पिढीतील सुधारणा आणण्याचा आमचा मानस व्यक्त केला होता. केंद्र सरकारने व्यापक-आधारावर जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण आणि प्रक्रिया सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्ताव तयार केला होता, ज्याचा उद्देश सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे हा होता.

केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या @GST_Council ने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दर्शवली आहे हे नमूद करताना आनंद होत आहे, ज्याचा लाभ सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना होईल.

या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः छोटे व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय सुलभता सुनिश्चित होईल.”

000000

संबंधित पोस्ट

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

बोधचिन्ह’ स्पर्धेत २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार;”भारताची राज्यघटना” विषयावर संबोधन..

vishwatmaklokswamivarta

मुंबई येथे डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-वेव्हज २०२५ : भारतासाठी जागतिक कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

नगरपालिका प्रभाग रचना कालमर्यादेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी