vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

रोजगार हमी योजनेतील जुनी अपूर्ण कामे आठ दिवसात पूर्ण करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

रोजगार हमी योजनेतील जुनी अपूर्ण कामे आठ दिवसात पूर्ण करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा द प्रतिनिधी: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्रामीण भागातील जुनी कामे अपूर्ण आहेत. ही कामे संबंधित यंत्रणांनी येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत, तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी (रोहयो) वृषाली मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

संबंधित यंत्रणांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जुन्या कामांची यादी तयार करुन ती कामे पूर्ण करावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जुनी कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन कामे हाती घ्यावीत. जुनी कामे का प्रलंबित राहिली याचा सविस्तर अहवाल सादर करावा. तसेच झालेल्या कामांचे सोशल ऑडीट तात्काळ करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.

सेवा पंधरवडा जिल्ह्यात येत्या 2 ऑक्टोंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. ज्या पाणंद रस्त्यांचा शेतकऱ्यांनी मंजुरी दिली तसेच रस्त्याला मान्यता मिळाली आहेत, असे रस्त्यांची कामे सेवा पंरधरवड्यात पूर्ण करावीत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्र बांबू लागवडी खाली कसे येईल, यासाठी ग्रामपंचायत विभाग, सामाजिक वनीकरण व कृषी विभागाने प्रयत्न करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री आवास योजना; लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

समृद्ध भविष्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे यशस्वी डेस्टिनेशन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंडो- अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय परिषद २०२६

सिल्लोड येथे आज (दि.२६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

दहावी बारावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर*

vishwatmaklokswamivarta

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग- चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उपक्रम- ⁠जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग- ⁠एकाच वेळी तीन विश्वविक्रमांना गवसणी- ⁠वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद- ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद…

विशेष लेख-जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta