vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर निर्बंध; औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर निर्बंध; औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम

 बुलडाणा, प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कप सिरपसह इतर औषधांच्या बेकायदेशीर विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विक्री करू नयेत, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत

अलीकडच्या काळात काही औषध विक्रेते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेअंतर्गत 21 औषध विक्रेत्यांची तपासणी केली. त्यात 16 औषध विक्रेत्यावर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कप सिरप विक्री केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. तसेच औषध विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदानुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन घिरके यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात एका वर्षांत १५.७२ लाख कोटींची गुंतवणूक,१ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

🏵️ लिव इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही : अशा जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय!*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान‘मिशन महाग्राम’राबवून गावे समृद्ध करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ