vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गआता दहापदरी होणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गआता दहापदरी होणार

मुंबई प्रतिनिधी –

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आता दहापदरी होणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ देखील कमी होण्याची अपेक्षा आहे. खासकरुन, सुट्ट्यांच्या काळात, कोंडी दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

या मार्गावर दरवर्षी वाहतुकीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ होत आहे. वाढलेल्या मार्गामुळे वाहतुकीची क्षमता वाढेल, त्यामुळे मालवाहतुकीसाठी, लोकांना प्रवासासाठी व पर्यटनासाठी मार्ग सुगम होईल. चौदा हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून पूर्ण केला जाईल. सध्या तेरा किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे, ज्यामध्ये खंडाळा घाटातील दहापदरी पदरी भाग समाविष्ट आहे. आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी वाहतुक कोंडीमुळे प्रवासाच्या तासांत अजून एका तासाची वाढ व्हायची. पण ही समस्या या विस्तारीकरणामुळे सुटणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होईल.

संबंधित पोस्ट

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, गटकर्ज व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावाया योजनांच्या लाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी पीककर्ज व किसान क्रेडीट कार्डसाठी ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत  -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

चारा लागवड उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते जामवाडी येथे उद्घाटन

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी कराव  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta