vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पासपोर्ट अर्जदारांसाठी संवाद सत्र-प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे

पासपोर्ट अर्जदारांसाठी संवाद सत्र-प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे

पुणे प्रतिनिधी-प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी ओपन हाऊस अर्थात संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.संवाद सत्रादरम्यान, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे अंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांतील पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात.

हे संवाद सत्र येत्या बुधवारी 10 डिसेंबर 2025 रोजी पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट बिल्डींग, सर्व्हे नंबर 5/2/2 बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने दिली आहे.

त्यासाठी अर्जदारांनी खालील तपशीलांचा उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर मेल करून आपल्या प्रश्नांची नोंद करावी.

फाइल क्रमांक-

नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर)-

नाव,

प्रश्न थोडक्यात…

यानंतर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत आपणास एक पुष्टीकरण ईमेल पाठवला जाईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्रात प्रवेश दिला जाईल, याची नोंद घ्यावी.

 ***

संबंधित पोस्ट

जेष्ठ साहित्यिक कलाकार यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक अंधेरी, मुंबई येथे महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

vishwatmaklokswamivarta

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

परवानाधारक/ वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” प्रभावीपणे राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नियोजनाबाबत विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta