vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

निक्षय मित्र बनुया, लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करु या…!प्रत्येक ग्रामपंचायतींनी क्षयरुग्णांचे सामाजिक दायित्व घेण्याचे आवाहन

निक्षय मित्र बनुया, लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करु या…!प्रत्येक ग्रामपंचायतींनी क्षयरुग्णांचे सामाजिक दायित्व घेण्याचे आवाहन

 

लातूर प्रतिनिधी: सध्या भारतात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत केंद्र सरकरने क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी क्षयरोगाचे उच्चाटनाचे नियोजन केलेले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 4 लाख अतिजोखीम गटातील व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नोंदणी करण्यात आलेल्या सर्व अतिजोखीम गटातील व्यक्तींचे एक्सरे तपासणी, बेडका तपासणी करण्यात येणार आहे.

सततचा खोकला, खोकल्यातून रक्त पडणे, छातीत दुखणे, वजन घटणे, भुक मंदावणे, रात्री घाम येणे, ताप येणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मानेवर किंवा काखेत गाठी येणे, आवाजात बदल होणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.

सद्यास्थितीत जिल्ह्यात 1 हजार 882 क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 365 रुग्णांना पोषण आहार किट पुरविले आहेत. अद्याप 1 हजार 517 क्षयरुग्ण प्रतिक्षेत असून जिल्ह्यातिल उपचारावर असलेल्या क्षयरुग्णांना निक्षय मित्र बनून वैयक्तिक, संस्था, लोकप्रतिनिधी, उद्योजक व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी व सीएसआरच्या माध्यमातून पोषण आहार किट देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान सुरु असून त्याअनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावरुन लोकसहभागातून क्षयरुग्णांना पोषण आहार किट देवून सामाजिक दायित्व निभवावे, असे आवाहन लातूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे.

पोषण आहार किटबाबातचा तपशिल- तांदुळ, गहू, ज्वारी- 3 किलो डाळ-1.5 किलो खाद्यतेल- 1 किलो,दूध पावडर- 1 किलो,दूध-6 लिटर,शेंगदाणे-1 किलो.पोषण आहार किटसाठी खालीलप्रमाणे 1 हजार 517 क्षयरुग्ण प्रतिक्षेत आहेत-शिरूर अनंतपाळ-14, देवणी-22, रेणापूर -24, लातूर ग्रामीण- 25,चाकूर- 44, जळकोट -45, औसा-63, निलंगा-65, अहमदपूर-97, उदगीर-314, लातूर शहर-804.

 

****

संबंधित पोस्ट

क्षयरोगाविषयी असलेले गैरसमज दूरकरण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी      – अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

आरोग्य विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघ ठरला अजिंक्य

हिवताप, डेंग्यू, साथरोग विषयक जाहीर जनजागृती शिबिरांचा नागरिकांनी घेतला लाभ

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

महसूल सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिरात दीडशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी…

असंसर्गजन्य आजारांविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभावी मोहीम