vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मी मतदानाचा अधिकार बजावणार’ – स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ..

‘मी मतदानाचा अधिकार बजावणार’ – स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ..

     नवी मुंबई प्रतिनिधी-     नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मधील ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे कोरे फलक उभारुन ‘मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियान’ व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात, ‘मतदान हा माझा अधिकार आणि तो मी बजावणार’ असा संदेश लिहिलेल्या स्वाक्षरी फलकावर नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी स्वाक्षरी करीत मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ केला आणि नवी मुंबईकर मतदारांना 15 जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

          यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक तथा महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनीही फलकावर स्वहस्ताक्षरात स्वाक्षरी करुन मतदान करण्याचा संदेश प्रसारित केला. यावेळी उपस्थित महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा निवडणूक विषयक स्वीप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ.अजय गडदे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, मालमत्ता कर विभाग उपआयुक्त डॉ. अमोल पालवे, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त्‍ डॉ. कैलास गायकवाड, उद्यान विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे, शिक्षण विभाग उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, कार्यकारी अभियंता श्री.प्रविण गाडे आणि इतर अधिकारी यांनीही फलकावर स्वाक्षरी करून सहभाग घेतला.

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक विषयक ‘मतदान जागरुकता अभियान अर्थात स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून स्वाक्षरी मोहीम हा त्याचाच एक भाग आहे. याकरिता नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती असते अशा वर्दळीच्या ठिकाणांवर ‘मतदान हा माझा अधिकार आणि तो मी बजावणार’ असा संदेश लिहिलेले स्वाक्षरी फलक लावण्यात आले असून नागरिकांनी यावर आपली स्वाक्षरी करुन आपण मतदान करणारच हा निश्चय दृढ करावा आणि इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश द्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

दिव्यांग आनंद मेळा’चे आयोज: २८ फेब्रुवारीपर्यंत मेळा राहणार सुरू

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 501 धोकादायक इमारतींची यादी जाहीर*

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुयोग्य विसर्जन व्यवस्थेत अनंत चतुर्दशीदिनी 10678 श्रीगणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना;दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक