vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी प्रभावी उपचार व पोषण पुनर्वसन सेवा

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी प्रभावी उपचार व पोषण पुनर्वसन सेवा

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी रामतनु माता बाल रूग्णालय तुर्भे येथे पोषण पुनर्वसन केंद्र (NRC – Nutrition Rehabilitation Centre) सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत तीव्र कुपोषित (SAM) तसेच मध्यम कुपोषित (MAM) बालकांची तपासणी, वैद्यकीय उपचार व पोषण पुनर्वसन सेवा दिली जात आहे.

          या एनआरसी केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांची ओळख, आवश्यकतेनुसार रुग्णालयीन उपचार, पोषण व्यवस्थापन व पुढील देखरेखीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 बालकांना तीव्र कुपोषण (SAM) असल्याच्या संशयावरून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या बालकांच्या पुढील वैद्यकीय तपासणी व मूल्यमापनानंतर त्यापैकी एका बालकामध्ये तीव्र कुपोषण (SAM) आणि दुस-या बालकामध्ये मध्यम कुपोषण (MAM) असल्याचे निष्पन्न झाले असून या दोन्ही बालकांची प्रकृती सध्य स्थिरआहे.

          तुर्भे रामतनु माता बाल रुग्णालयाव्यतिरिक्त वाशी, नेरुळ व ऐरोली सार्वजनिक रुग्णालयांमार्फत आत्तापर्यंत 128 तीव्र कुपोषण (SAM) असलेल्ाबालकांवर आणि 713 मध्यम कुपोषण (MAM) बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. गरजेनुसार या बालकांचे पोषण सुधारण्यासाठी RUTF (Ready to Use Therapeutic Food) आहार व इतरआहार देऊन उपचार करण्यात आले आहेत.

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मागील वर्षात 18 पोषण व आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये आढळणा-या संशयित बालकांना रुग्णालयामध्ये संदर्भित करण्यात येते. त्याठिकाणी त्यांची तपासणी करून खातरजमा केली जाते व त्यांच्यावर आवशकतेनुसार उपचार केले जातात.

          नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत कुपोषणमुक्त बालक घडविण्याच्या उद्देशाने सातत्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात येत असून, पोषण पुनर्वसन केंद्राच्या (NRC) माध्यमातून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक सेवा दिली जात आहे.

00000

संबंधित पोस्ट

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक,उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.संपर्क समन्वय योजना तयार करुन आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश…

30 वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

vishwatmaklokswamivarta

वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा* 🌳

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभाग मार्फत मुंबईतील चेंबूर गार्डन आणि अनेक ठिकाणी  जयंती निमित्त आरोग्य शिबिर आणि शरबत अल्पोहार पाणी वाटून परिसरात जयंती साजरी…