vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

68 लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध* *तीन दिवसात दिली जातात जन्म – मृत्यू प्रमाणपत्रे*

*68 लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध* *तीन दिवसात दिली जातात जन्म – मृत्यू प्रमाणपत्रे*

       नवी मुंबई प्रतिनिधी   महानगरपालिकेशी संबंधित लोकसेवा नागरिकांना तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून या 68 लोकसेवा विनासायास एका क्लिकवर उपलब्ध आहेत. नागरिकांना महानगरपालिकेशी संबधित कामे कार्यालयात जावे न लागता सहजपणे करता यावीत या गोष्टीकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे विशेष लक्ष असून त्यादृष्टीने 68 लोकसेवांसह आणखी 49 महानगरपालिकेच्या इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवरून तसेच माझी नवी मुंबई – My NMMC ॲपवरुनही नागरिक या सेवांचा लाभ सहजतेने उपलब्ध करून घेऊ शकतात.

यामधील जन्म नोंदणी व मृत्यू नोंदणी या महत्वाच्या सेवा आहेत. महानगरपालिकेने सन 2024 पासूनच जन्म व मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यास सुरुवात केली असून हे प्रमाणपत्र अर्ज केल्यापासून 3 दिवसात देण्यात येते. महानगरपालिकेने जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये 16902 ऑनलाईन जन्म प्रमाणपत्रे वितरीत केली आहेत. महत्वाचे म्हणजे ही प्रमाणपत्रे शासनाने विहित केलेल्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये वितरित केलेली आहेत.

रुग्णालयात झालेल्या जन्म व मृत्यूच्या घटनांची नोंद महानगरपालिकेच्या संबधित विभाग कार्यालयात ऑनलाईन करणे रूग्णालयास बंधनकारक आहे. या नोंदी करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयास https://dc.crsorgi.gov.in ही विशेष संगणक प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या संगणक प्रणालीमध्ये जन्म तसेच मृत्यूची नोंद करते वेळी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करुन संबधितांचा ई मेल व मोबाईल क्रमांकाची नोंद घेणे आवश्यक आहे. रुग्णालयांकडून प्राप्त ऑनलाईन अर्जाची छाननी संबधित विभाग कार्यालय स्तरावरुन केली जाते व विहित शुल्काची आकारणी करुन तीन दिवसांच्या कालावधीत जन्म प्रमाणपत्र दिले जाते.

   नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पारदर्शक व गतीमान कामकाजाच्या दृष्टीने नागरिकांचे हित लक्षात घेऊन 117 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…

पिंपरी चिंचवड महापालिका व दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी दरम्यान मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर आयोजित ‘पर्पल जल्‍लोष’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…

vishwatmaklokswamivarta

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प”-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार

सायन कोळीवाडा येथील हार्बर रेल्वे लाईन गुरु तेग बहादुर स्टेशन फूटबोर्ड व लिफ्ट समस्या ज्येष्ठ नागरिक हैराण…

vishwatmaklokswamivarta