vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

हिंद-दी-चादर” अंतर्गत आयोजित आरोग्य शिबीरांचा 6 हजारहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

“हिंद-दी-चादर” अंतर्गत आयोजित आरोग्य शिबीरांचा 6 हजारहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

आरोग्य प्रतिनिधी

          ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणा-या कार्यक्रमापूर्वी 10 फेब्रुवारीपासून नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिरांचे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत 124 ठिकाणी आरोग्य शिबीरांचे नियोजन करण्यात आले आहे.

          आतापर्यंत आयोजित आरोग्य शिबिरांमधील तपासणी व सुविधांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला असून 10 फेब्रुवारी रोजी 4 ठिकाणी 475, 11 फेब्रुवारी रोजी 10 ठिकाणी 964 आणि 12 फेब्रुवारी रेाजी 14 ठिकाणी 3318 इतक्या नागरिकांनी वैद्यकिय सुविधांचा लाभ घेतला आहे.

           आज 13 फेब्रुवारी रोजी 13 विविध ठिकाणी आयोजित शिबीरांना 1503 नागरिकांनी भेट देउुन आरोग्य तपासणी करुन घेतली. यामध्ये माता बाल रुग्णालय बेलापूर तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे नेरूळ १, कुकशेत, तुर्भे, पावणे, महापे, कोपरखैरणे सेक्टर १४, नोसिलनाका, राबाडा, कातकरीपाडा, कोपरखैरणे सेक्टर १६, ऐरोली व दिघा यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.

          या शिबीरांमधील आरोग्य तपासणी अंतर्गत उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या निदानासाठीची तपासणी, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी, माता व बालकांचे आरोग्य आणि लसीकरण, क्षयरोग होण्याची अतिजोखीम असलेल्या महिलांची क्षयरोग निदान तपासणी, सिकलसेल रोग (SCD) तपासणी करण्यात येत आहे. यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान नाक व घसा रोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक अशा अनुभवी तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

           महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त ही आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येत असून मागील 4 दिवसातील 37 ठिकाणच्या शिबीरांचा लाभ 6260 इतक्या मोठया संख्येने नागरिकांनी घेतला असल्याची माहिती देत वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी या पुढील काळात आपल्या घराजवळ आयोजित केल्या जाणा-या आरोग्य शिबीरांना भेट देऊन आपली वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शंभर दिवसीय’ क्षय रुग्ण शोध मोहिमेस सहकार्य करावे -जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतीश कोपुरवाड 

उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी* *राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा 1 मार्च रोजी शुभारंभ

दिव्यांग लाभार्थींसाठी शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत शेलगाव आटोळ येथे महिलांची आरोग्य तपासणी

जागतिक लोकसंख्या दिन : सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात .