vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सातारा जिल्ह्यात रोजगाराची संधी: मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा;मुख्यमंत्री युवा कार्य’ योजनेचाही मोठा टप्पा

सातारा जिल्ह्यात रोजगाराची संधी: मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा;मुख्यमंत्री युवा कार्य’ योजनेचाही मोठा टप्पा

सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात आयोजित ११ रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून ६६९ उमेदवारांची प्राथमिक, तर १०७ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उपक्रमांतर्गत एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत जिल्हयातील विविध तालुक्यांमध्ये एकूण ११ मेळावे घेण्यात आले. या माध्यमातून १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय (सर्व ट्रेड), डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेल्या कुशल व अर्धकुशल तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

ख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा गाजावाजाशासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेने सातारा जिल्ह्यातील तरुणांना मोठा आधार दिला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 हजार 736 तरुणांची निवड करण्यात आली असून, त्यांना विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.१२ वी उत्तीर्ण: ६,००० रुपये, आयटीआय / पदविका (Diploma): ८,००० रुपये तर पदवीधर १०,००० रुपये योजनेअंतर्गत मिळणारे विद्यावेतन मिळणार आहे.

“तरुणांनी रोजगाराच्या या संधींचा लाभ घेण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in व www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कसहभागासाठी काय करावे?ज्या उमेदवारांना आगामी रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी व्हायचे आहे किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी:ऑनलाईन नोंदणी: https://rojgar.mahaswayam.gov.in व www.cmykpy.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावर आपली माहिती नोंदवावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कुणबी जात प्रमाणपत्र नोंदी शोधण्यासाठी संकेतस्थळाची मदत घ्या – विभागीय आयुक्त जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर गावागावातील अभिलेख उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

भटक्या समाजातील विद्यार्थ्यांच्या जीवनात जातीच्या दाखल्यांमुळे सकारात्मक परिवर्तन – अप्पर मुख्य सचिव विकास खारगे- भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरण – पाणंद रस्ते खुले केल्याबद्दल शिष्टमंडळाने व्यक्त केली कृतज्ञता..

vishwatmaklokswamivarta

पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन…

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट