vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

     अमरावती, प्रतिनिधी: आर्थिक वर्षाच्या शेवटी मालमत्ता खरेदी दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 26 मार्चपासून सलग ही कार्यालये सुरू राहतील.

    नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांत नियंत्रक यांच्या निर्देशानुसार, इष्टांक पूर्तीच्या दृष्टीने दि. 26 मार्च, दि. 28 मार्च, दि. 29 मार्च आणि दि. 31 मार्च या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये चालू राहतील. तसेच ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी ही शनिवार आणि रविवार सोडून अन्य दिवशी आहे. ती कार्यालये त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस चालू ठेवावीत. उपरोक्त दिवसांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क इत्यादी कामकाज विहीत वेळेत पूर्ण होण्यासाठी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये देखील कार्यरत राहणार आहे.

      सुट्टीच्या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आणि सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय चालू राहणार असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरुन करावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक बाळासाहेब घोंगडे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

vishwatmaklokswamivarta

सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा; विविध विकासकामांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

जनतेला शासकीय सेवांचा लाभ वेळेत मिळेल याची खबरदारी घ्या – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव