vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा*28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा*28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

   आरोग्य प्रतिनिधी- अमरावती, : रक्ताशी संबंधित असलेल्या हिमोफिलिया आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि या आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे ‘हिमॅटोलॉजी डे केअर सेंटर’ येथे जागतिक हिमोफिलिया दिन साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील 28 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

    हिमोफिलियाच्या रुग्णांना रक्तातील संबंधित ‘फॅक्टर’ द्यावे लागतात. मात्र, 5 ते 10 टक्के रुग्णांमध्ये ठराविक काळानंतर या फॅक्टरचा परिणाम दिसून येत नाही. त्यांच्या शरीरात फॅक्टरच्या विरोधात ‘इन्हीबिटर’ तयार होतात. ही बाब लक्षात घेऊन, जागतिक हिमोफिलिया दिनाचे औचित्य साधून शिबिरातील 28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी करण्यात आली.    शिबिरात तज्ज्ञांनी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आजाराची सखोल माहिती दिली. हिमोफिलियासोबत आयुष्य सुरक्षितपणे करून जगावे, वेदना कशाप्रकारे कमी कराव्यात आणि नियमित उपचार कसे घ्यावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

     हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. सोळंके आणि अधिसेविका श्रीमती अटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमासाठी डे केअर युनिटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जाधव, डॉ. प्रिती वासनकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. नेहा कांबळे, समन्वयक त्रिशिला इंगोले, समुपदेशक मनोज सहारे, अधिपरिचारिका अनामिका चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ललिता अग्रवाल, समुपदेशक मनोज पाटील आणि डॉ. बेलसरे यांनी पुढाकार घेतला.

00000

संबंधित पोस्ट

महिलांसाठी ‘सशक्त’ अभियान

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम;स्थलांतरित मजुरांसाठी ‘आरोग्य साथी’ प्रशिक्षण संपन्न*

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव विद्यापीठाच्या सेवेत ’रुग्णवाहिका’दाखल

प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई येथे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचा आढावा व “निक्षय पोषण किट” वितरणाचा तालुका स्तरीय शुभारंभ..

एच आय व्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणा-या आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta