vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जनगणना २०२७ साठी आज १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू-नागरिकांनी सहभागी होण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

जनगणना २०२७ साठी आज १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू-नागरिकांनी सहभागी होण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

नवी मुंबई प्रतिनिधी- देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असलेल्या जनगणना २०२७ प्रक्रियेची नवी मुंबईमध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना या महत्वपूर्ण राष्ट्रव्यापी उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

   जनगणना 2027 ही देशातील पहिली डिजीटल जनगणना असून ही प्रक्रिया अचूक, पारदर्शक व विश्वसनीय माहिती (Self Enumeration) या सुविधेला प्राधान्य देण्यात आले आहे.    नागरिकांनी दि. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची माहिती ऑनलाईन भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ही स्वगणना नागरिक आपल्या मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून घर, कार्यालय अथवा अन्य कोणत्याही ठिकाणाहून करू शकतात. मात्र कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती स्वगणनेसाठी नोंदणी करू शकतो. ही प्रक्रिया सोपी, जलद, सुरक्षित असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.    स्वगणना (Self Enumeration) साठी नागरिकांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हे प्रश्न चार मुख्य भागात विभागलेले आहेत.

भाग १: घराची स्थिती -1. गणना घराच्या जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य 2. गणना घराच्या भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य 3. गणना घराच्या छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य 4. गणना घराची स्थिती

भाग २: कुटुंबाची माहिती -5. कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 6. कुटुंब प्रमुखाचे नाव 7. कुटुंब प्रमुखाचे लिंग 8. जर कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर प्रवर्गातील असल्यास 9. गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती 10. केवळ या कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या 11. या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या भाग ३: कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी -12. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत 13. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत 14. प्रकाशाचा मुख्य स्रोत 15. शौचालयाची उपलब्धता 16. शौचालयाचा प्रकार 17. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था 18. स्नानगृहाची उपलब्धता 19. स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एलपीजी / पीएनजी जोडणी 20. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन भाग ४: कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती –

21. रेडिओ/ट्रान्झिस्टर 22. दूरचित्रवाणी 23. इंटरनेट उपलब्धता 24. लॅपटॉप/संगणक 25. दूरध्वनी/मोबाईल फोन/स्मार्ट फोन 26. सायकल/स्कूटर/मोटरसायकल/मोपेड 27. कार/जीप/व्हॅन 28. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य 29. मोबाईल क्रमांक (फक्त जनगणनेसंबंधी संपर्ककरिता) जनगणना ही शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.  नवी मुंबई शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.       नागरिकांनी यामध्ये जबाबदारीने सहभागी होऊन अचूक माहिती देणे आवश्यक आहे. हीच माहिती शहराच्या विकासाचा मार्ग ठरविणार आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे

    त्यातही स्वयंनोंदणीमुळे नागरिकांचा वेळ वाचतो आणि माहिती अधिक अचूकपणे नोंदविता येते.      त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या सुविधेचा लाभ घ्यावा.    नागरिकांचा सक्रीय सहभाग हा शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आपली जनगणना, आपला विकास या संकल्पनेतून प्रत्येकाने पुढाकार घेत जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे

00000

संबंधित पोस्ट

फलटणमध्ये शेतकरी व ग्रामपंचायतीच्या – १०० एकर क्षेत्रावर फळबाग व देशी वृक्ष लागवड-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहानाला उद्योग जगताचाही सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार् करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित करणार- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्यादृष्टीनेकौशल्य विकास कार्यक्रम तयार करा- मंत्री नितेश राणे

विशेष वृत्त-राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण

vishwatmaklokswamivarta