vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

शेवगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

शेवगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

अहिल्यानगर, प्रतिनिधी : स्वातंत्र्यसैनिक पद्मभूषण बाळासाहेब भारदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे ऑगस्ट २०२६ सत्रासाठी विविध व्यवसायांच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्राचार्य जी. बी. हडतगुणे यांनी केले आहे.
शेवगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध व्यवसायांसाठी एकूण २०८ जागा उपलब्ध आहेत. संस्थेमध्ये वेल्डर, पंप ऑपरेटर-कम-मेकॅनिक, फिटर, वायरमन, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशीनिस्ट, टर्नर तसेच मेकॅनिक मोटार वाहन (एमएमव्ही) या व्यवसायांमध्ये प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार असून दि. ३० जून २०२६ पासून व्यवसाय व संस्थानिहाय पसंतीक्रम नोंदणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. उमेदवारांनी आपल्या पसंतीनुसार व्यवसाय व संस्थांची निवड करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, भव्य क्रीडांगण, अभ्यासिका, ग्रंथालय तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी ‘ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ (ओजेटी) सुविधाही उपलब्ध करून देण्यात येते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) संदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. उद्योग, कारखाने व विविध आस्थापनांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्थेमार्फत विशेष प्रयत्न केले जातात.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेमध्ये समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात प्रवेशा संबंधित सर्व माहिती तेथे उपलब्ध आहे

संबंधित पोस्ट

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 नोव्हेंबरला भरती मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

लघुलेखक (उच्चश्रेणी) लघुलेखक, लघु टंकलेखक पदांकरीता इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी समक्ष कार्यालयात भेट द्यावी

vishwatmaklokswamivarta

विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्य पुरविण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांनी निविदा सादर करण्याचे आवाहन

स्टॅंड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

महाराष्ट्र उदयोन्मुख तंत्रज्ञान निधी स्थापन करण्याचा निर्णय- उद्योग मंत्री उदय सामंतॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेमिंग विकासासाठी धोरण तयार करण्यात येणार प्रादेशिक मराठी आशय निर्माण करणाऱ्या स्टुडिओंना देखील स्वतंत्ररित्या प्रोत्साहन