vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट – महापौर श्रीमती रितू तावडे

मुंबईत येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट – महापौर श्रीमती रितू तावडे

मुंबई प्रतिनिधी –

मुंबई महानगरात येत्या काळात किमान १ लाख झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यादृष्टीने पडीक मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, रस्ते दुभाजक, उड्डाणपुलांखालील जागा अशा विविध पर्यायांचा शोध घेऊन वृक्ष लागवडीची निश्चिती करावी. विशेषतः मुंबई महानगराचे सौंदर्य खुलवणारे व त्याचवेळी धूळ आणि प्रदूषण नियंत्रणास मदत होईल, अशा प्रकारचे हरितक्षेत्र विकसित करावयाचे आहे. त्यामुळे हा संकल्प तडीस नेण्यासाठी सातत्याने आढावा घेण्यात येईल, अशी सूचना मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली आहे.

🔷मुंबई महानगरातील पडीक मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, वाहतूक बेटे तसेच रस्ते दुभाजक, उड्डाणपुलांखालील जागा इत्यादी ठिकाणी शक्य तिथे वृक्ष लागवड व हिरवळ फुलवणे याअनुषंगाने मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आज (दिनांक १६ जून २०२६) सायंकाळी बैठक पार पडली. त्यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी विविध सूचना केल्या.

🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. (श्रीमती) चंदा जाधव, उपआयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, उपआयुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटे, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती संध्या नांदेडकर, उपआयुक्त (परिमंडळ ६) डॉ. संतोषकुमार धोंडे, उपआयुक्त (परिमंडळ ७) श्री. मनीष वळंजू, उपआयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (रस्ते) श्री. मंतय्या स्वामी, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सांगितले की, मुंबईतील हरित संपदा वाढावी याकडे महापौर या नात्याने माझा विशेष भर आहे. जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला वेग देण्यासाठी तसेच विविध संकल्पना राबवून मुंबईमध्ये किमान १ लाख झाडे येत्या काही दिवसांत लागवड करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. त्यादृष्टीने सर्व परिमंडळीय उपआयुक्त तसेच रस्ते विभाग, पूल विभाग, उद्यान विभाग यांनी आपापल्या सूचना व आराखडे सादर करावेत. रस्त्यांच्या दुतर्फा, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे, उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागा इत्यादी ठिकाणी झाडे लावणे शक्य आहे. त्यादृष्टीने शोध घ्यावा. विलेपार्लेमध्ये उड्डाणपुलाखाली शहरी शेती हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला आहे. अशा अभिनव संकल्पनांवर विचार करावा. उड्डाणपुलांवर व्हर्टिकल गार्डनसारख्या पर्यायांचाही विचार करावा. आवश्यकता असल्यास त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना महापौर श्रीमती तावडे यांनी केली.

🔷उपमहापौर श्री. संजय घाडी म्हणाले की, महापौरांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेले हे विशेष वृक्ष लागवड अभियान हा चांगला उपक्रम आहे. विशेषतः उड्डाणपुलांखालील जागा मोकळी व स्वच्छ करून तेथे वृक्ष लागवड करायला हवी. लागवड केलेली रोपे व झाडे जगतील, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. या प्रयत्नांना अभियानाचे स्वरूप देऊन अंमलबजावणी करावी. फळझाडे व औषधी झाडे लावता येतील का, याचाही या अभियानामध्ये विचार व्हावा, अशी सूचना उपमहापौर श्री. घाडी यांनी केली.🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले की, मुंबईतील वृक्षांची संख्या व हिरवळ वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नवीन पूल, उड्डाणपूल, रस्ते, प्रकल्प इत्यादी साकारल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या जागांवर वृक्षराजीसाठी प्राधान्य द्यायला हवे. सर्व मिळून किमान एक लाख झाडे लावता येतील, इतकी जागा मुंबईभर उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तसा शोध लवकरात लवकर घ्यावा आणि पुढील बैठकीत संबंधितांनी आराखड्यासह संपूर्ण माहिती सादर करावी. बांबू लागवडीसारखा पर्याय हा मुंबईतील वातावरणात पोषक व पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त आहे. अशा विविध मुद्द्यांचा समावेश करून या उपक्रमाची वेगाने अंमलबजावणी करावी, असे डॉ. ढाकणे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

 

🔷तत्पूर्वी, बैठकीत सर्व उपआयुक्त व अधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली व यथायोग्य माहिती सादर केली.

संबंधित पोस्ट

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ठाण्यात केले ट्रेनचे जंगी स्वागत खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनुकंपा नियुक्ती* *गरजू कुटुंबांच्या घरात एका क्षणात परतला आनंद*

पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुस्लिम औरंगजेबाची नव्हे, आपलीच अवलाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मीरा रोडमधील बकरी ईद वादावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे वक्तव्य*

राहुरी पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे प्रशिक्षण