vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 1 लाख 16 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 1 लाख 16 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

बुलढाणा प्रतिनिधी: शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र १ लाख १६ हजार ४३६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. या याद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावचे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, बँक शाखा तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकरी बांधवांनी त्वरित आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी (Farmer ID) आणि आधार कार्ड सोबत घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्रावर जावून आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.

योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय अथवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने दाद मागता येणार आहे.

सदर कर्जमुक्ती योजनेचे कामकाज सहकार विभाग, महसूल विभाग आणि बँक प्रशासन यांच्यामार्फत एकत्रित व सुयोग्य प्रकारे केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये विनाकारण गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत, त्यांनी विलंब न करता नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडीला मोठा धक्का! माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश 

जिल्ह्यातील युवक-युवतींना मोफत कौशल्य विकासाची संधी;कौशल्य प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 14 ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta