vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणव जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणव जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

 

जालना, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनबाबत प्रशिक्षण व जनजागृतीपर कार्यक्रम महसूल भवन येथे पार पडला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे व सरिता सुत्रावे, तहसीलदार प्रणाली तायडे, मुंबई सेवाचे चिंतामणी कदम, अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, 108 रुग्णवाहिका समन्वयक मनोज जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख दीपक काजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यामध्ये प्राथमिक आगीपासुन बचाव व सुरक्षीतेकरीता रंगीत तालीम तसेच अग्निशामक यंत्राचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी मार्गदर्शन केले. तर सीपीआर अर्थात प्रथमोपचार कसा प्रकारे करावा याबाबत 108 रुग्णवाहिका समन्वयक मनोज जाधव यांनी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.

आपत्तीचे नैसर्गिक व मनुष्यनिर्मित आपत्ती असे दोन प्रकार पडतात. आग, पुरपरिस्थिती, रस्ते अपघात, दुष्काळ, भूकंप, साथीचा रोग, वीज पडणे आदि आपत्तीमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती देत अपघातग्रस्तांना कशाप्रकारे मदत पुरवावी तसेच प्रथमोपचार औषध पेटीमधील साहित्याचा वापर कशाप्रकारे करावा. अपघातग्रस्त व्यक्तींच्या हातावरील रक्तस्त्राव तसेच डोक्यावरील जखमेला कशाप्रकारे पट्टी बांधावी म्हणजे त्या व्यक्तीस दवाखान्यात दाखल करेपर्यंत आराम मिळेल आणि त्याचा जीव वाचू शकेल यासाठी सविस्तर माहिती मुंबई सेवाचे चिंतामणी कदम यांनी दिली. तसेच अतिघाई, काळजी तसेच जंकफुडपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. नागरिकांना आपातकालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष -1077, पोलिस नियंत्रण कक्ष-100/112, रुग्णवाहिका-108/102 आणि अग्निशामक दल-101 या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

00000000

संबंधित पोस्ट

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी कराव  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास राज्यांच्या समन्वयाने शक्य- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी कुपोषण निर्मूलन व महिलांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी व योजनांच्या बळकटीकरणाची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी..

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांचे आवाहन; 30 जानेवारीपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

पी.एम. किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणे बंद झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा

लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !कोणतीही बाधा नाही ; शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावाजिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta