vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

माजी सैनिकांसाठी डेटा डिजिटायझेशनसाठी नोंदणी बंधनकारक…

माजी सैनिकांसाठी डेटा डिजिटायझेशनसाठी नोंदणी बंधनकारक…

अलिबाग प्रतिनिधी: सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या तर्फे सर्व माजी सैनिकांचा डाटा डिजिटायझेशन/संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील सेवा निवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युद्ध विधवा, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता आणि अवलंबित यांनी १ मार्च २०२५ पूर्वी आपल्या नोंदी करणे अत्यावश्यक आहे.

नोंदणीसाठी www.ksb.gov.in https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळांचा वापर करावा.नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड,पॅन कार्ड,सैन्यसेवा पुस्तकाची छायांकित प्रत,

माजी सैनिक ओळखपत्र,पासपोर्ट साईझ फोटो,ECHS कार्ड,बँक पासबुक छायांकित प्रत. नोंदणी केल्यानंतर संबंधित कागदपत्रांसह फॉर्म लवकरात लवकर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जमा करावा.

निर्धारित वेळेत नोंदणी न केल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कल्याणकारी आर्थिक मदत व इतर सेवा मिळणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी.या उपक्रमासाठी माजी सैनिकांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत्त) यांनी केले

संबंधित पोस्ट

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta

नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवल*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

अमली पदार्थांबाबतची माहिती 112 या क्रमांकावर द्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास,वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण