vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुधागड पंचायत समितीला आय.एस.ओ. मानांकन 

सुधागड पंचायत समितीला आय.एस.ओ. मानांकन

 

राज्य प्रतिनिधी -रायगड जिल्ह्यातील सुधागड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अधिकारी लता मोहिते यांना गुरुवारी (दि.२७) आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले‌. विशेष म्हणजे आयएसओ मानांकन मिळवणारी सुधागड पंचायत समिती रायगड जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.

शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स,फॉर्मस, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९ मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.‌ सुधागड पंचायत समितीन प्रशासनाने कार्यालयाचे सुशोभीकरण, पंचायत समितीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे नियोजन, सभेत नियमित विषयांवर चर्चा, वृक्षारोपण करणे यासह शासकीय योजना राबविण्यावर भर दिला आहे.

जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समिती व ग्रामपंचायतीना आयएसओ करण्यासाठी व्हि.एन.टेक्नो. रिसर्च प्रा.लि. कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अधिकारी लता मोहिते यांनी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले‌. पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश घरत, तालुका कृषी अधिकारी मिलिंद चौधरी, विस्तार अधिकारी सुनील आहेर, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजन थळे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ

लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांचे प्रश्न निकाली काढा अन्यथा आंदोलन- लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट ,पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, हवामान खात्या चा अंदाज..

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा*माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!*

vishwatmaklokswamivarta

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ 2.0 कार्यान्वित;जनतेसाठी अधिक सोयीस्कर आधुनिक सुविधा उपलब्ध होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस