vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…

मुंबई प्रतिनिधी-

दक्षिण मुंबईतील कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग उन्नत मार्ग’ चे लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

🔹महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. यतीन दळवी, जल अभियंता श्री. पुरुषोत्तम माळवदे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

🕔हा उन्नत मार्ग नागरिकांसाठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुला राहणार आहे. निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी naturetrail.mcgm.gov.in या लिंकवरून सशुल्क ऑनलाइन तिकीट बूक करता येणार आहे.

🌲निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा नागरिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.🌿

मुंबईतील कमला नेहरू पार्कपासून सुरू होतो आणि मलबार हिलच्या जंगलातून गिरगाव चौपाटीपर्यंत जातो. पदपथाचा शेवटचा भाग पर्यटकांना अरबी समुद्राच्या दृश्याचा आनंद घेण्याची संधी देईल. 485 मीटर लांबीच्या या उंच रस्त्यावर समुद्राच्या दृश्यांसाठी एक डेक देखील आहे. यासाठी सर्वसामान्यांसाठी तिकिटाची किंमत 25 रुपये असेल, तर परदेशी पर्यटकांसाठी 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे बांधण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये विकसित केलेल्या ट्री टॉप वॉक प्रमाणेच मुंबईत विकसित केलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.

संबंधित पोस्ट

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत उपराष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

प्रशासनिक न्यायाधिकरणाची लोकअदालत;१७ प्रकरणात तडजोड

आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील*समाज कल्याण विभागाचा पुढाकार

मराठी जेन झी साठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न..